Islampur | कोमल बनसोडे यांच्या उपोषणाला NCP चा पाठिंबा | Corporator | Sakal Media<br />इस्लामपूर - प्रभाग ३, ५ व १४ या राखीव दलित प्रभागांमध्ये दलित वस्ती योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या कामांच्या ठिकाणी 'लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजना' असे नामफलक लावण्यात यावेत, या मागणीसाठी नगरसेविका कोमल बनसोडे यांनी आज लाक्षणिक उपोषण केले. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच नगरसेवकांनी विकास आघाडीच्या बनसोडे यांचे समर्थन करत पूर्ण पाठिंबा जाहीर केला. मुख्याधिकारी वैभव साबळे यांनी येत्या पाच दिवसात फलक लावून घेण्याचे आश्वासन बनसोडे याना आज दिले.<br />#Islampur #Corporator #NCP